Thursday, November 12, 2015* एन. एफ. पी.ई. *
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज यूनियन ग्रुप – सी
विभागीय शाखा – अमरावती
परिपत्रक क्रं. १                   फक्त सभासदांसाठी                   ऑक्टोबर २०१५

प्रिय सभासद बंधु – भगीनींनो

            आपल्या संघटनेचे ४४ वे द्विवार्षिक अधिवेशन दिनांक २५ ऑक्टोबर २०१५ रोजी जोशी हॉल, अमरावती येथे थाटामाटात संपन्न झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉम. पी. एन. बाकडे हजर होते. प्रमुख अतिथि म्हणून कॉम. मंगेश परब सर्कल सेक्रेटरी मुंबई, कॉम. सुरेन्द्र पालव, सहायक सर्कल सेक्रेटरी, कॉम. सुरेश सावंत, कोषाध्यक्ष, कॉम. एल. एम. परिमल माजी प्रांताध्यक्ष महाराष्ट्र, कॉम. शंकरराव कडूसकर माजी केंद्रीय नेते, कॉम. एस.एस.साठे, रीजनल सेक्रेटरी तसेच पोस्टमन व जी. डी. एस. यूनियनचे सर्व विभागीय नेते उपस्थित होते. सर्वच उपस्थितांनी सभागृहाला मोलाचे मार्गदर्शन केले.

            अधिवेशनाचे शेवटी पुढील दोन वर्षासाठी खालील कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली.

नवीन पदाधिकारी २०१५ – २०१७

अध्यक्ष             -     कॉम. ए. एस. गिरनाळे, सहायक डाकपाल, परतवाडा
उपाध्यक्ष            -     कॉम. मोहम्मद मुजीब, ओ. ए. प्र. अ. कार्यालय, अमरावती
उपाध्यक्ष            -     कॉम. ए. आर. पाटील, पोस्टमास्तर ग्रेड – १, रूख्मींनींनगर
उपाध्यक्ष            -     कॉम. आर. एस. शिरभाते, उप डाकपाल, गोकुळ मार्केट
विभागीय सचिव      -     कॉम. व्ही. के. कापसे, पी. ए. अमरावती एच. ओ.
सहसचिव           -     कॉम. ए. आर. सिनकर, पी. ए. अमरावती एच. ओ.
सहसचिव           -     कॉम. एस. एम. पोकळे, पी. ए. वलगाँव
कोषाध्यक्ष           -     कॉम. एच. व्ही. खापरे, पी. ए. अमरावती एच. ओ.
सहकोषाध्यक्ष        -     कॉम. के. एच. टाके पी. ए. अमरावती एच. ओ.
सहकोषाध्यक्ष        -     कॉम. मोहन मुकुंदे, पी ए. परतवाडा एच. ओ.
संघटन सचिव       -     कॉम. एस. व्ही. राऊत, पी. ए. रूख्मींनींनगर
संघटन सचिव        -     कॉम. डी. जी. उमाळे, पी. ए. चांदूर रेल्वे
संघटन सचिव       -     कॉम. व्ही. पी. निंभोरकर, पी. ए. वरुड
संघटन सचिव        -     कॉम. ए. एन. माहुरे, पी. ए. दर्यापूर
संघटन सचिव        -     कॉम. एस. एम. वानखडे, ओ. ए. प्र. अ. कार्यालय,
ऑडिटर            -     कॉम. एम. पी. कट्यारमल, पी. ए. बडनेरा

स्त्री कर्मचार्‍यांच्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण करून संघटन सशक्त रहावे तसेच स्त्री अत्याचाराला आला बसावा या दृष्टीकोंनातून केंद्रीय शाखेच्या धोरणाला अनुसरून खालील महिला निवारण समितिची स्थापना करण्यात आली आहे.
महिला तक्रार निवारण समिति

प्रमुख            सौ. सुनंदा विधाते, ए. पी. एम. अमरावती एच. ओ.
सदस्य      -     सौ. सिंधुताई वानखडे, पी. ए. भाजी बाजार
सदस्य       -     सौ. मीना खाडे, पी. ए. अमरावती कॅम्प
सदस्य       -     सौ. छाया वेरूळकर, पी. ए. अमरावती एच. ओ.
सदस्य       -     कु. पद्मिनी बेंडे, लेखापाल, परतवाडा एच. ओ.
सदस्य       -     सौ. सीमा पखाले, पी. ए. परतवाडा एच. ओ.
सदस्य       -     सौ. रुचिता मोहेकर, ओ. ए. प्र. अ. कार्यालय, अमरावती
सदस्य       -     सौ. स्मिता देशमुख, पी. ए. अमरावती एच. ओ.
सदस्य       -     सौ. नम्रता बांबल, पी. ए. अमरावती एच. ओ.
सदस्य       -     कु. शिल्पा बोदडे, पी. ए. अमरावती एच. ओ.
सदस्य       -     कु. शुभांगी कडू, पी. ए. चांदूर. बाजार
सदस्य       -     कु. स्नेहल तितुरकर, पी. ए. रूख्मींनींनगर
सदस्य       -     कु. मनीषा बुरडे, पी. ए. परतवडा एच. ओ.

कार्यकारी सभासद

एम. ई. अडीकणे, व्ही, आर. डहाट, डी. आर. गीते, आर. जे. श्रीराव, एन. पी. गिरीपुंजे, आर. एन. पटेरिया, जे. बी. चव्हाण, बी. आर. पवार, व्ही. व्ही. सोसे, जे. बी. गांवपांडे, यू. एस. सगणे, मिलिंद उपरोट, अंकित कांडलकर, के. डी. भोयर, प्रशांत वैरागडे, शिलधन ढोणे, जी. व्ही. ठाकरे, संदीप कुलकर्णी, पी. डी. फरकुंडे, सागर ढोके, ऋषिकेश ढोके, व्ही. आर. मालविय, योगेश गिरी, सी. के. वासेकर, डी. आर. हूड, एस. आर नाईक, आर. जी. कदम, पंकज धोंडे, एस,, खान, कु. रूपाली गोंडचोर, कु. अमिता चंदनपत्री, कु. उषा पाटील, कु. अश्विनी गवई, कु. उज्ज्वला गावंडे.

बोनस देणगी

संघटनेची आर्थिक स्थिति सुदृढ बनविण्यासाठी संघटनेजवळ पर्याप्त निधि असणे गरजेचे आहे. कारण मासीक वर्गणीतला मोठा वाटा हा केंद्रीय व सर्कल यूनियनला पाठवावा लागतो तसेच फेडरेशनला पण कोटा पाठवावा लागतो. त्यामुळे उर्वरित निधिमध्ये विभागीय संघटनेचे कार्य सुरळीत चालू शकत नाही. म्हणून प्रत्येक सभासदाने बोनस वाटपावर रुपये ३००/- तीनशे वर्गणी आपल्या प्रतिनिधीकडे जमा करावी ही विनंती.


आंदोलन कार्यक्रम.

१ व २ डिसेंबर २०१५ रोजी दोन दिवसांचा संप आयोजित केलेला आहे. संपाच्या मागण्या खालील प्रकारे आहेत.

१.      ७ व्या वेतन आयोगामध्ये सर्व जी. डी. एस. कर्मचार्‍यांचा समावेश करावा.
२.      सर्व प्रकारच्या कर्मचार्‍यांच्या नवीन भरती करणे. (पी. ए., पोस्टमन, इत्यादि. )
३.      Cadre restructuring ची सर्व cadre मध्ये अमलबजावणी करण्यात यावी.
४.      विविध प्रकारच्या नवीन स्कीम अमलात आणण्यासाठी कर्मचार्‍याचा होणारा छळ थांबविण्यात यावा.

तरी वरील होणार्‍या संपामध्ये सामील होऊन आपण आपल्या एकजुटीचे प्रदर्शन करावे.

कोअर बँकिंग प्रणाली व आपली भूमिका

आपणास ज्ञात आहे की आपल्या विभागामध्ये सध्या सर्व डाकघरे हे कोअर बँकिंग प्रणाली मध्ये आणण्यात येत आहे. त्यामध्ये आपल्याकडील संचय पोस्ट मधील डाटा हा नवीन वेबबेस प्रणाली (Finacle) मध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. हे सर्व आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. त्यामुळे हे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल पण ते शिकण कठीण नक्कीच नाही कारण जेंव्हा संचय पोस्ट आले होते ते आपण थोड्या वेळाने का होईना पण निश्चितच आत्मसात केले होते.

            तरी पण माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आलेल्या बदलाला आपण सकारात्मकपणे सामोरे जाऊ या. नवीन आलेला प्रोग्राम (Finacle) हा अतिशय सोपा व आपणा सर्वांसाठी सुरक्षित आहे. विशेषतः माझी सर्व वरिष्ठ बंधु व भगिनींना विनंती आहे की याला घाबरून आपण सेवानिवृत्ती किंवा सुटीचा विचारही मनात आणू नका. आपण Finacle मध्ये सहजतेनी काम करू शकता किंबहुना आपले काही बांधव काम करीत आहेत. आपणाला योग्य ते तांत्रिक सहकार्य निश्चितच प्रशासनाकडून तसेच आपल्या संघटनेतील Finacle प्रशिक्षित सभासदांकडून भेटेल याची खात्री मी आपल्याला देतो.
आवाहन
सन्माननिय कर्मचारी बंधु व भगिनींनो,

            आपल्याला आपल्या कष्टाचे दाम दरमहिन्याला नियमित मिळतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी महागाई भत्ता व बोनसही मिळतो. पण या देशाचा पोशिंदा शेतकरी मात्र निसर्गाचे लहरीपणामुळे हलाखीचे जीवन जगतो आहे. याला कंटाळून काहीजण आत्महत्या करीत आहेत. त्यांना आज सहानुभूतीची व आधाराची गरज आहे. आपण मोठ्या मनाने त्यांना आधार व यथायोग्य आर्थिक मदत देण्यासाठी खारीचा वाटा उचलू शकता व आपले एक सामाजिक कर्तव्य पार पडू शकतो.

            तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण शक्य तितकी आर्थिक मदत कार्यकारिणीतील कोणत्याही सदस्याकडे जमा करावी. आपणा सर्वांकडून प्राप्त होणारी रक्कम “नाम फाऊंडेशन, जी शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करते, त्यांना देण्याचा आमचा मानस आहे. याव्यतिरिक्त कोणाचे काही वेगळे विचार असतील तर त्याचे स्वागत आहे. मदत देणार्‍यांची नावे आपल्या संघटनेच्या वेबसाइटवर पाहायला मिळतील.


            आपण आपले विचार, सूचना व अडचणी डाकेद्वारे त्याचप्रमाणे विभागीय संघटनेच्या e-mail – aipeup3amravati@gmail.com वर पाठवू शकता. त्याचप्रमाणे विभागीय शाखेच्या website  वरून आपण आवश्यक ते फॉर्म व इतर माहीत पाहू शकता. विभागीय संघटनेची वेबसाइट खाली दिलेली आहे.

सर्वांना दिपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या

एन. एफ. पी. ई. जिंदाबाद                                 आपला स्नेहांकीत
डाक कर्मचारी एकता जिंदाबाद                               वैभव क. कापसे
धन्यवाद !                                              (विभागीय सचिव)
                              पुस्त प्रेश
            श्री/श्रीमती __________________________________________
            ______________________________________________
           

No comments:

Post a comment