विशेष परिपत्रक क्रमांक २ (फक्त सभासदांसाठी) दिनांक – ११ एप्रिल २०१६.
आदरणीय कर्मचारी बंधु व भगिनींनो,
हे
एकदिवसीय संपाचे विशेष परिपत्रक मी आपणापुढे सादर करीत आहे. आपल्या मनात कदाचित
असा विचार येत असेल की आता हा संप कशासाठी? ७ व्या वेतन आयोगाच्या
अंमलबजावणीसाठी या अगोदरच सचिव स्तरावरील कमिटी स्थापित करण्यात आलेली आहे व
त्याचा निर्णय लवकरच आपणास कळणार आहे. मग हा संप कशासाठी ?
मित्रांनो सध्या आपणास सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे ती सी.बी.एस. Finacle
आणि की पी.एल.आय. Maccamish ची.
आपल्या
संघटनेने परिवर्तनाला कधीही विरोध केला नाही. आपल्या विभागामध्ये होणारे बदल आपण
नेहमीच स्वीकार केलेले आहेत. या अगोदरही संचय पोस्ट सॉफ्टवेअर आपल्या खात्यामध्ये
आले व आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये काम केले व आपल्या खात्याला
बचत विभागात एका नव्या उंचीवर आणून ठेवलेले आहे. सरकारने भारतीय डाक विभागाचे
संपूर्ण संगणकीकरण करण्याचा मोठा घाट घातला आहे व लवकरच पोस्ट बँक सुद्धा स्थापन
करण्यात येत आहे. आपण या परिस्थितीला नक्कीच सकारात्मकपणे सामोरे जाणार आहोत. सद्यस्थितीत
सी.बी.एस. Finacle व पी.एल.आय. Maccamish या
वेबबेस्ड सॉफ्टवेअर चा उपयोग करण्यात येत आहे. परंतु सध्याची आपली स्थिति ही एक ना
धड अन भाराभर चिंध्या अशी झाली आहे व या सर्व प्रकारचा त्रास फक्त आपल्यासारख्या
साधारण कर्मचार्याला होत आहे. Finacle ची लिंक नेहमीच बंद
असते. Maccamish हे कासवगतीने काम करीत आहे. आपल्या सर्व
डाकघरांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी आलेल्या फॉर्मचा खच पडून आहे, परंतु लिंक नसल्यामुळे किंवा पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे ते
काम पूर्ण करता येत नाही व याकरिता जबाबदार त्या कर्मचार्याला किंवा उपडाकपालाला
धरण्यात येवून बळीचा बकरा बनविल्या जाते. या सर्व बाबी जेव्हा अधिकार्यांच्या नजरेत आणून
दिल्या जातात तेंव्हा हे अधिकारी म्हणतात लिंक नाही मी काय करू? तुम्हाला काम करावेच लागेल त्याकरिता तुम्ही एकतर सकाळी लवकर या म्हणजे
लिंक असेल नाहीतर EOD झाल्यावर काम करा. आपल्या सॉफ्टवेअर ची
लिंक ही सकाळीच किंवा रात्री १२ नंतरच का येते याचे उत्तर कोण देणार. एका वरिष्ठ
अधिकार्याने तर कहरच केला त्यांनी तर असे आदेश दिले की कोणतेही कारण चालणार नाही
तुम्हाला नवीन खाते हे ३१ मार्च पर्यन्त उघडावे लागतील.
आपण
या सी.बी.एस. Finacle चे स्वागत घरात येणार्या एखाद्या नव-वधूसारखे
रांगोळी काढून व केक कापून केले. परंतु घरात आलेला नवीन पाहुणा हा आपल्याच जिवावर
उठेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. मागील गेल्या काही दिवसांपासून तर आपले
कर्मचारी १० ते १२ तास सेवा प्रदान करीत आहेत, तेही कोणत्याही
अतिरिक्त मोबदल्याची अपेक्षा न करता. महिला कर्मचार्यांना रात्री ९ वाजेपर्यंत
कार्यालयात काम करावे लागते व आपले अधिकारी बरोबर ६ वाजता घराकडे निघतात.
सी.बी.एस. Finacle च्या त्रासापासून अधिकारी मात्र मोकळे.
बंधु
भगिनींनो, यामुळे आपल्या खात्याची प्रतिमा तर मलिन होतच आहे, परंतु सर्वसाधारण नागरिकांचा रोष हा आपल्यासारख्या कर्मचार्यांवर निघत
आहे. याचे एक उदाहरण म्हणजे मुंबई येथील माटुंगा पोस्ट ऑफिस. या पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांदवारे
संगणकाची तोडफोड करण्यात आली. यामुळे कर्मचार्यांची सुरक्षा हे विभाग कशी करणार?
नुकतेच
आपल्या संघटनेचे प्रांतीय अधिवेशन दिनांक २६ ते २८ मार्च २०१६ रोजी सातारा येथे
संपन्न झाले. यामध्ये सर्वच विभागीय सचिवांनी सी.बी.एस. Finacle व पी.एल.आय. Mccamish बद्दल आपला रोष व्यक्त केला. आपल्या
महाराष्ट्र प्रांतीय संघटनेने व केंद्रीय संघटनेने या अगोदरच Finacle व Mccamish च्या स्पीड बद्दल वरिष्ठ अधिकार्यांना
पत्र लिहिलेले आहे, परंतु आजपर्यंत यावर कोणताही तोडगा
निघालेला नाही. अधिकारी नुसते आश्वासन देत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून
महाराष्ट्र प्रांतीय शाखेने दिनांक २१ एप्रिल २०१६ रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक
संपाची घोषणा केलेली आहे. संपाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. तरी मी आपणा
सर्वांना कळकळीची विनंती करितो की आपण आपल्या अस्तित्वासाठी ही लढाई लढायची आहे. त्याग
आणि लढल्याशिवाय काही मिळत नाही हा इतिहास आहे. तरी सर्वांनी या एक दिवसीय संपात
सहभागी होऊन संघटन बळकट करून आपल्या एकजुटीची ताकद दाखवावी,
ही विनंती.
प्रमुख मागण्या
1. Finacle चे मुख्य सर्वर योग्य प्रकारे मेंटेन करण्यात यावे. लिंक बंद झाल्यावर ती
ताबडतोब पूर्ववत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.
2. Sify
connectivity ची bandwidth ही Single व Double handed पोस्ट ऑफिस करिता कमीतकमी 512 KBPS, Tripple किंवा LSG करिता – 1 MBPS, 2 MBPS MDG करिता व 4 MBPS प्रधान डाक
घराकरिता असावी.
3. सर्व
पोस्ट ऑफिस ला यू.पी.एस. बॅटरी, जनरेटर, पासबूक
प्रिंटर, लेसर प्रिंटर पुरविण्यात यावे.
4. जर कर्मचारी
त्याच्या ड्यूटि तासापेक्षा जास्त वेळ काम करीत असेल तर त्याला १५०/- रुपये प्रती
तास incentive देण्यात यावा.
5. Finacle व Mccamish ची संपूर्ण काम करण्याची पद्धत (Operating
Procedure) सर्व कर्मचार्यांना देण्यात यावी.
6. सर्व
कर्मचार्यांना Finacle व Mccamish चे योग्य
प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे.
7. सर्व
पोस्ट ऑफिस मध्ये Internet Connectivity राहील याची खात्री करावी.
एन.एफ.पी.ई. जिंदाबाद आपला
स्नेहाकीत
डाक कर्मचारी एकता जिंदाबाद (वैभव कापसे)
धन्यवाद ! विभागीय सचिव
प्रती,
श्री/श्रीमती __________________________
__________________________________
__________________________________.
No comments:
Post a Comment