+ एन. एफ. पी. ई. +
ऑल
इंडिया पोस्टल एम्प्लॉईज यूनियन ग्रुप – सी
विभागीय
शाखा – अमरावती
परिपत्रक क्र. 1 फक्त सभासदांसाठी फेब्रुवरी 2020.
प्रिय सभासद बंधु, - भगिनींनो
आपल्या संघटनेचे 46 वे द्विवर्षिक अधिवेशन
दिंनांक 02 फेब्रुवरी 2020 रोजी मृगेंद्र मठ, अमरावती येथे
थाटामाटात संपन्न झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉम. ए. एस. गिरनाळे हजर होते.
प्रमुख अतिथि म्हणून कॉम. शैलेश देशपांडे, सर्कल
उपाध्यक्ष, महाराष्ट्र सर्कल. कॉम. संजय साठे, रिजनल सचिव, नागपुर तसेच
पोस्टमन यूनियनचे कॉम. पाचपोर उपस्थित होते. सर्वच उपस्थितांनी सभागृहाला मोलाचे
मार्गदर्शन केले.
अधिवेशनाचे शेवटी पुढील दोन वर्षासाठी खालील
कार्यकारिणी अविरोध निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकारी
2020 – 2022
अध्यक्ष - कॉम. व्ही. व्ही. सोसे, उप-डाकपाल
ब्राम्हणवाडा थडी
उपाध्यक्ष - कॉम.
ए. आर. सिनकर, डाक सहायक, अमरावती एच. ओ.
उपाध्यक्ष - कॉम.
आर. एस. शिरभाते, उप-डाकपाल, यावली
उपाध्यक्ष - कॉम.
आर. आर. मोहेकर, कार्यालय सहायक अमरावती डी. ओ.
विभागीय सचिव - कॉम. व्ही. के. कापसे, डाक सहायक, अमरावती एच.
ओ.
सहसचिव - कॉम. एम.
एन. शिवणकर, डाक सहायक, वलगाव
सहसचिव - कॉम. एम.
डब्लु. मुकुंदे, डाक सहायक, परतवाडा एच. ओ.
सहसचिव - कॉम. एस.
व्ही. राऊत, डाक सहायक, अमरावती एच. ओ.
कोषाध्यक्ष - कॉम. के. एच. टाके, डाक सहायक, बडनेरा
सहकोषाध्यक्ष - कॉम.
व्ही. पी. निंभोरकर, डाक सहायक, रुख्मिणी नगर
सहकोषाध्यक्ष - कॉम.
एस. एम. शेकोकार, डाक सहायक, परतवाडा एच. ओ.
संघटन सचिव - कॉम.
जी. व्ही. ठाकरे, डाक सहायक, मोर्शी
संघटन सचिव - कॉम.
एस. एम. वानखडे, डाक सहायक, व्ही. एम. व्ही.
संघटन सचिव - कॉम.
एस. डी. ढोणे, डाक सहायक, वरुड
संघटन सचिव - कॉम.
व्ही. आर. मालविय, डाक सहायक, धारणी
ऑडिटर - कॉम. एम. पी. कट्यारमल, डाक सहायक, अमरावती कॅम्प
महिला कर्मचार्यांच्या समस्यांचे वेळोवेळी
निराकरण करून संघटन सशक्त रहावे तसेच स्त्री अत्याचाराला आळा बसावा या
दृष्टिकोणातून केंद्रीय शाखेच्या धोरणाला अनुसरून खालील महिला निवारण समितीची
स्थापना करण्यात आली आहे.
महिला तक्रार
निवारण समिति
अध्यक्ष - सौ. पी. ए. कालपांडे, डाक
सहायक , अमरावती एच. ओ.
सदस्य - कु. मनिषा बुरडे, डाक
सहायक, दर्यापूर
सदस्य - सौ. आर. पी. जयस्वाल, डाक
सहायक, अमरावती
एच. ओ.
सदस्य - सौ. स्मिता देशमुख, कार्यालय
सहायक, अमरावती डी. ओ.
सदस्य - सौ. रूपाली खरबडे, डाक
सहायक, अमरावती
एच. ओ.
इंडिया पोस्ट
पेमेंट बँक व आधार टार्गेट बाबत
सध्याच्या परिस्थितीत अमरावती विभागातील सर्वच
कर्मचार्यांवर इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे खाते उघडण्याकरिता, आधार व्यवहार
करण्याकरिता तसेच पी. एल. आय. / आर. पी. एल. आय चे उद्धिष्ट साध्य करण्याकरिता
वरिष्ठ अधिकार्यांकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. भारतीय डाक विभागाचे
निष्ठावान कर्मचारी म्हणून तसेच भारत देशाचा एक नागरिक म्हणून आपण नेहमीच आपली
कर्तव्ये व जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडलेली आहे व नजीकच्या भविष्यात
निश्चितपणे आपण पार पाडू. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Finacle व CSI,
जे आपण सर्वांनी लवकरच आत्मसात केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण आपले दैनंदिन कामकाज
पार पाडून निश्चितच इंडिया पोस्ट पेमेंट
बॅंकचे खाते देखील उघडत आहोत, आधार कार्ड अद्ययावत करणे, पी. एल. आय /
आर. पी. एल. आय. उघडणे हे कार्य देखील करीत आहोत. तरीही कोणत्याही दबावाला बळी न
पडता आपले कार्य सुरू राहू द्या, आपली बलाढ्य संघटना नेहमीप्रमाणे आपल्या पाठीशी निश्चितच
आहे याची खात्री बाळगा.
आपल्या अमरावती विभागीय शाखेने, आपल्या सर्कल
कार्यकारिणीला विनंती केलेली आहे की नवीन पेन्शन योजना बंद करण्याकरिता लवकरच
वरिष्ठ स्तरावर मोठे आंदोलन करणे गरजेचे आहे, जेणेकरून
आपल्या नवीन येणार्या बंधु/भगिनींना जुनी पेंशन योजना लागू करता येईल. तरीही मी
आपणास आवाहन करतो की येणार्या भविष्यात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन
लागू करण्याकरिता होणार्या आंदोलनात सर्व कर्मचार्यांनी मोठ्या प्रमाणावर
एकत्रित होणे गरजेचे आहे. लक्षात असुदया सर्वांनी एकजूट होणे ही काळाची गरज आहे व
एकजुटीचे फळ हे निश्चितच मिळते.
आपण आपले विचार, सूचना व अडचणी
डाकेद्वारे त्याचप्रमाणे विभागीय संघटनेच्या ईमेल - aipeup3amravati@gmail.com वर पाठवू शकता.
त्याचप्रमाणे विभागीय शाखेच्या website
वरून आपण आवश्यक ते फॉर्म व इतर माहिती पाहू शकता. विभागीय
संघटनेची वेबसाइट खाली दिलेली आहे.
आपल्या अमरावती विभागीय शाखेचे अध्यक्ष व
माजी सर्कल उपाध्यक्ष महाराष्ट्र सर्कल श्री अनंतराव गिरनाळे,
परतवाडा व ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या पदाची अपेक्षा न करता,
स्वत:च्या परिवाराप्रमाणे या संघटनेच्या कोषाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली ते श्री
हरीभाऊ खापरे हे मागील वर्षात सेवानिवृत झालेत. त्यांच्या कार्य कुशलतेची व
त्यांच्यामधील निष्ठावान कार्यकर्त्याची उणीव संघटनेला निश्चितच जाणवेल. अमरावती
विभागीय शाखेचे आदरणीय पितामह कॉम. परिमल साहेब यांचे सहकार्य जसे सतत आपणास मिळते
त्याचप्रमाणे कॉम. अनंतराव गिरनाळे व कॉम. हरीभाऊ खापरे यांचे देखील सहकार्य
निश्चितच आपणास मिळेल ही खात्री बाळगतो. या सर्व मान्यवरांना पुढील आयुष्य निरोगी
व आनंददायी जावो ही शुभेछ्या. लाल सलाम.
सर्वांना पुढील
वाटचालीकरिता हार्दिक शुभेछ्या
एन. एफ. पी. ई. जिंदाबाद आपला स्नेहांकीत
डाक कर्मचारी एकता जिंदाबाद वैभव क.
कापसे
धन्यवाद | (विभागीय सचिव)
पुस्तप्रेस
श्री/श्रीमती____________________________________
__________________________________________
__________________________________________.
No comments:
Post a Comment