Sunday, November 22, 2015

आवाहन
सन्माननिय कर्मचारी बंधु व भगिनींनो,

           आपल्याला आपल्या कष्टाचे दाम दरमहिन्याला नियमित मिळतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी महागाई भत्ता व बोनसही मिळतो. पण या देशाचा पोशिंदा शेतकरी मात्र निसर्गाचे लहरीपणामुळे हलाखीचे जीवन जगतो आहे. याला कंटाळून काहीजण आत्महत्या करीत आहेत. त्यांना आज सहानुभूतीची व आधाराची गरज आहे. आपण मोठ्या मनाने त्यांना आधार व यथायोग्य आर्थिक मदत देण्यासाठी खारीचा वाटा उचलू शकता व आपले एक सामाजिक कर्तव्य पार पडू शकतो.

           तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण शक्य तितकी आर्थिक मदत कार्यकारिणीतील कोणत्याही सदस्याकडे जमा करावी. आपणा सर्वांकडून प्राप्त होणारी रक्कम “नाम फाऊंडेशन, जी शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करते, त्यांना देण्याचा आमचा मानस आहे. याव्यतिरिक्त कोणाचे काही वेगळे विचार असतील तर त्याचे स्वागत आहे. मदत देणार्‍यांची नावे आपल्या संघटनेच्या वेबसाइटवर पाहायला मिळतील. 

आतापर्यंत खालील सभासदांकडून आर्थिक मदत जमा झाली आहे.

श्री विजय सोसे         -     ५००.००
श्री एस. व्ही. राऊत     -     ५००.००
श्री के. एच. टाके       -     १००.००
श्री वैभव कापसे        -     ५००.०० 

No comments:

Post a comment