Monday, November 23, 2015

विशेष परिपत्रक
विशेष परिपत्रक (फक्त सभासदांसाठी)

प्रिय सभासद बंधु भगिनींनो,

            आपणास ज्ञात आहे की आपल्या संघटनेने दिनांक १ व २ डिसेंबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. संपाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

१. ७ व्या वेतन आयोगामध्ये सर्व जी. डी. एस. कर्मचार्‍यांचा समावेश करावा.
२.  सर्व प्रकारच्या कर्मचार्‍यांच्या रिक्त जागेवर नवीन भरती करणे.
३. कॅडर रिस्ट्रक्चरिंग सर्व कॅडर मध्ये अमलबजावणी करण्यात यावी.
४.विविध प्रकारच्या नवीन स्कीम अमलात आणण्यासाठी कर्मचार्‍यांचा होणारा छळ थांबविण्यात यावा.

            त्याचप्रमाणे नुकताच दिनांक १९ नोवेम्बर २०१५ रोजी ७ व्या वेतन आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केलेला आहे. त्याचे अवलोकन केल्यावर आपल्याला लक्षात येईल की या अहवालामध्ये कनिष्ट पदावरील कर्मचारी व वरिष्ठ पदावरील कर्मचारी यांच्या वेतनामध्ये फार मोठी तफावत आहे व आपणाला हवी तशी वेतन वाढ दिलेली नाही. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी दिनांक २७.११.२०१५ रोजी काळा दिवस” म्हणून पाळावयाचा आहे व काळ्या फिती लावून निषेध नोंदवायचा आहे. सर्वच केंद्रीय कर्मचारी काळ्या फिती लावून त्याचा विरोध करणार आहेत.

            आपणाला दिनांक १ व २ डिसेंबर २०१५ रोजीचा ४८ तासांच्या संपात सामील व्हायचे आहे व संप १००% यशस्वी करावयाचा आहे. आपल्या एकजुटीचे प्रदर्शन करायचे आहे.

एन.एफ.पी.ई. जिंदाबाद                    आपला स्नेहांकीत
डाक कर्मचारी एकता जिंदाबाद               वैभव क. कापसे
धन्यवाद !                              (विभागीय सचिव)

No comments:

Post a comment