Tuesday, February 07, 2012

AIPEU P-III Circle Conference


+ एन.एफ.पी.ई.+
अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना ग्रुप सी
अमरावती विभाग – अमरावती
अमरावती               विशेष परिपत्रक          जानेवारी २०१२

सर्कल अधिवेशन २०१२

          मागील द्विवर्षिक सर्कल अधिवेशन डिसेंबर २००९ मध्ये चंद्रपुर येथे संपन्न झाले. त्यावेळी पुढील अधिवेशन घेण्याची जबाबदारी अमरावती विभागावर सोपविण्यात आली. त्यानुसार हे ३५ वे द्विवर्षिक प्रांतीय अधिवेशन “श्रीराम भवन” रेस्ट हाऊस जवळ, बडनेरा (अमरावती) येथे दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०१२ दरम्यान घेण्याचे निश्चित झालेले आहे. या अधिवेशनात आपले जनरल सेक्रेटरी कॉ. के.व्ही. श्रीधरन सतत तीन दिवस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर मार्गदर्शन व चर्चा अपेक्षित आहे. अनेक महत्वाच्या व ज्वलंत प्रश्नांवर आपल्याला अद्यावत माहिती प्राप्त होणार आहे. तसेच भविष्यातील चळवळी व आंदोलंनांची दिशाप्राप्ती माहिती करून घेण्याची हीच वेळ असणार आहे.

          अधिवेशनाचे ठिकाण हे बडनेरा रेल्वे  स्टेशन पासून फक्त एक किलो मिटर दूर व पायी चालत गेल्यास फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. बडनेरा रेल्वे स्टेशनवर थोडे समोर गेल्यास उपडाकघर आहे व तेथे आपल्या मदतीसाठी अमरावती विभागाचे स्वयंसेवक हजर राहतील. महाराष्ट्रातील व गोव्यातून रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रतींनिधींना बडनेरा येथे उतरण्यासाठी सर्वच रेल्वे गाडया सोयीच्या आहेत. कारण बडनेरा हे मुंबई-कलकत्ता या मुख्य रेल्वे लाइनवर जंक्शन स्टेशन आहे व येथे सर्वच गाडया थांबतात. बडनेरा हे अमरावती महानगरचाच एक भाग आहे. मुख्य व मध्यवर्ती शहर हे येथून दहा किलोमीटर अंतरावर आहे.

          गोवा, कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, पुणे व मुंबई या भागातून अमरावतीसाठी येणार्‍या बसेस सुद्धा बडनेरा मार्गेच अमरावतीच्या प्रमुख बसस्थांनाकांकडे जातात तेंव्हा बसने प्रवास करणार्‍यांनी सुद्धा बडनेरा येथेच उतरावे. बस स्थानक ते अधिवेशन फक्त पंधरा मिनिटांत गाठता येते.

          अधिवेशन स्थळी निवासाची तसेच भोजनाची उत्कृष्ठ व्यवस्था ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तरीपण थंडीचा शेवट व उन्हाळ्याची चाहूल हा ऋतु असल्यामुळे सोबत पुरेशी पांघरूणाची सोय असणे गरजेचे आहे. खुले अधिवेशन पाहिल्याच दिवशी दि. १९.०२.२०१२ रोजी ठीक ११.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

          वाढती महागाई व परिपूर्ण व्यवस्था याचा विचार करूनच प्रतिंनिधी फी ६००/- ठेवण्यात आली आहे. व ती प्रत्येकाला बंधनकारक राहील. अमरावती महानगरी ही आपल्या महामाहीम राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाताई देवीसिंह शेखावत (पाटील) यांची कर्मभूमि व निवास नगरी आहे.

अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे

१)    मेळघाट व्याघ्र प्रकल्प : ११० कि. मी. आपल्याला अनेक प्रकारचे हिंस्त्र प्राणी बघायला आवडेल. त्यासाठी वनविभागाच्या विशेष वाहनाने सेमाडोह येथून परवानगी मिळवून आनंद लुटता येतो.
२)    चिखलदरा : थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतांच्या सान्निध्यात उंच ठिकाणी वसलेले ब्रिटिशकालीन स्थल, येथे असंख्य टेकड्या, दर्‍या व नद्या यांचे उत्कृष्ठ विहंगम दृश्य व मनोरंजक पॉइंट बघायला मिळतात. हे ठिकाण बडनेरा येथून ११० कि. मी. अंतरावर आहे.
३)    कौडण्यपुर रुख्मिणीचे माहेर : बडनेरा येथून ६० कि. मी. अंतरावर हे पुरातन कालीन मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाने रुख्मीणीला हरण करून काही कल या ठिकाणी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे.
४)    गुरुकुंज आश्रम : बडनेरा येथून ४५ कि. मी. अंतरावर वंदनीय राष्ट्रसंत परमपूज्य तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिर आहे. भव्यदिव्य आश्रम, भक्त निवास, व शैक्षणिक उपक्रम येथे राबविले जातात.
५)    मुक्तागिरी : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वतांच्या पायथ्यांशी, उंच टेकडीवर, भव्य धबधब्यांच्या तोंडावर दिगंबर पंथी जैन धर्मियांची कोरीव मूर्ति व आकर्षक मंदिरे या ठिकाणी मनमोहून टाकतात हे ठिकाण बडनेरा वरुन ८५ कि. मी. अंतरावर आहे.
६)    गाडगेबाबा समाधी : ग्राम स्वछतेचे पुजारी व उपासक संत वैरागी श्री गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी समाधी मंदिर अमरावती महानगरीतच अधिवेशन स्थळापासून १५ कि. मी. अंतरावर आहे.
७)    श्री अंबादेवी व एकवीरा देवी : या आराध्य देवींचे सुप्रसिद्ध मंदिर फक्त १० कि. मी. अंतरावर यांच्या दर्शनाने भक्तगण पावन झाल्याचा आनंद उपभोगतात.
८)    जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ : आई अंबादेवीच्या मंदीरालगतच या जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा भव्यदिव्य मैदानी परिसर आहे. जगप्रसिद्ध ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, मल्लखांब, ध्ंनुर्विद्या, बास्केटबॉल व सर्वच वैयक्तिक आणि सांघिक खेळांचे भव्य मैदान, अनेक शैक्षणिक उपक्रम येथे राबविले जातात. भारताच्या अनेक प्रांतातील विद्यार्थी शारीरिक शिक्षण घेण्यासाठी येथे दाखल होतात.
९)    कोण्डेश्वर मंदिर : बडनेरा पासून फक्त ४ कि. मी. अंतरावर हे प्रसिद्ध शिवालय आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी व येणार्‍या शिवरात्रीच्या पर्वावर येथे भव्य यात्रा उत्सव असतो.

इच्छा असल्यास वेळेचे बंधन पाळून आपण या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन मनमुराद आनंद उपभोगू शकता.
टिप : आपले किती प्रतिनिधि येणार याची माहिती पाठवा.
एन.एफ.पी.ई. जिंदाबाद |
अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना जिंदाबाद |
-    संपर्कासाठी – कॉ. एल.एम.परिमल    ९४२२८८८४३८
-                कॉ. एच.व्ही.खापरे      ९४०३३०६१४७
-                कॉ. ए.आर.पाचपोर     ९४२२९१५५९९
-                कॉ. ए.एस.गिरनाळे     ९४२२९१४२२३
           
---*प्रेषक*---
आयोजन समिति द्विवार्षिक प्रांतीय अधिवेशन अमरावती
श्री एल.एम.परिमल  श्री मोहम्मद मुजीब  श्री वैभव कापसे  श्री आर.जी.मोडक श्री एच.व्ही.खापरे
     अध्यक्ष           उपाध्यक्ष                सचिव          सहसचिव      कोषाध्यक्ष
अ.भा.डा.क. संघटना ग्रुप सी – अमरावती
श्री एम.ई.अडीकने श्री पी.एन.बाकडे श्री ए.आर.पाचपोर श्री पी.जी.देहनकर  श्री ए.एस.गिरनाळे
     अध्यक्ष        उपाध्यक्ष        सचिव         सहसचिव       स्वागत सचिव
श्री मोहन मुकुंदे   श्री व्ही.व्ही.सोसे श्री ए.आर.सिनकर श्री पी.एन.वैरागडे  श्री डी.आर.गीते
 सहकोषाध्यक्ष      उपाध्यक्ष    संगठन सचिव    संगठन सचिव   संगठन सचिव
श्री एस.डी.थोरात    श्री मनोज कट्यारमल    श्री वाय. एच. टाके       श्री डी.एम.भुयार
 संगठन सचिव           ऑडिटर                 विशेष सहाय्यक          सहाय्यक
-----महिला प्रतिंनिधी-----
कु. पद्मिनी बेंडे सौ. प्रतिभा कालपांडे सौ रुचिता मोहेकर सौ मीरा शिवणकर कु. स्नेहल तितुरकर सौ. अपर्णा सरोदे कु. अश्विनी गवई कु. वृशाली अडसोड सौ अनुपमा सोनकामले
समस्त सभासद अमरावती विभाग

No comments:

Post a comment